बकऱ्या चोरीचा संशय; कारची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 23:38 IST2019-03-08T22:42:06+5:302019-03-08T23:38:10+5:30

शंभरफुटी रोडवरील वातावरण तणावपूर्ण

Bugs suspected of theft; Car breakdown | बकऱ्या चोरीचा संशय; कारची तोडफोड

dhule

धुळे : बकरीची चोरी करणारी कार आल्याच्या संशयावरुन जमावाने त्या कारची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी सकाळी शंभरफुटी रोडवर घडली़ याप्रकारामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते़
शहरातील शंभरफुटी रोड भागात एमएच ०२ बीझेड ७६६१ क्रमांकाची कार उभी होती़ ही कार बकरी चोरी करण्यासाठी आली असल्याची अफवा क्षणार्धात या भागात पसरली़ एका पाठोपाठ एक याप्रमाणे कारजवळ नागरीक जमा झाले़ कोणत्याही प्रकारचा विचार न करता जमावाने कारची तोडफोड करण्यास सुरुवात केली़
कारचे संपूर्ण काच फोडण्यात आला असून कारचा पत्रा देखील तोडण्यात आला़ नेमके काय सुरु आहे हे कळायच्या आत या कारची नासधूस झाली होती.
या प्रकारामुळे शंभरफुटी रोडवरील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते़ घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पथक घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी चिघळणारे वातावरण शांत करत तोडफोड झालेली कार पोलीस ठाण्यात आणली़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता़

Web Title: Bugs suspected of theft; Car breakdown

टॅग्स :Dhuleधुळे