नाल्यातील पाइपात म्हैस अडकून पाण्यात गुदमरून म्हशीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:39 IST2021-09-06T04:39:54+5:302021-09-06T04:39:54+5:30

वडजाई येथील शेतकरी भटू साहेबराव देवरे यांची म्हैस दिवसा शेतात चराईसाठी गेली होती. दुपारपर्यंत व्यवस्थित चराई करत होती. मात्र ...

Buffalo suffocates in Nala pipe | नाल्यातील पाइपात म्हैस अडकून पाण्यात गुदमरून म्हशीचा मृत्यू

नाल्यातील पाइपात म्हैस अडकून पाण्यात गुदमरून म्हशीचा मृत्यू

वडजाई येथील शेतकरी भटू साहेबराव देवरे यांची म्हैस दिवसा शेतात चराईसाठी गेली होती. दुपारपर्यंत व्यवस्थित चराई करत होती. मात्र चार वाजता म्हैस महामार्ग चौपदरीकरणाच्या रस्त्याच्या कामासाठी व नाल्यातून पाणी वाहून जाण्यासाठी पाइप टाकण्यात आला होता. ती म्हैस नाल्यात पाणी पिण्यासाठी उतरली असता गाळामध्ये फसली. तेथून निघत असताना मोठ्या पाइपात ती घुसली. मात्र, त्या पाइपात फसल्यामुळे तिला बाहेर निघता आले नाही. म्हशीचे मालक व आजूबाजूचे शेतकरी यांनी दोर बांधून ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते असफल ठरले. त्यात म्हशीच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे जीव गुदमरून म्हैस मरण पावली. शेवटी, जेसीबी मशीन बोलावून म्हशीला बाहेर काढण्यात आले.

शेतकरी जोडव्यवसाय म्हणून म्हैसपालन करून दुग्ध व्यवसाय करत असतात. शेतात नुकसान नेहमीच होत असते. परंतु, दुग्ध व्यवसायातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. या म्हशीचे वैशिष्ट्य असे होते की, म्हैस अवघ्या दोन महिन्यांत एका पारडूला जन्म देणार होती. ती म्हैस दोघं सांज मिळून १४ लीटर दूध देत होती. विशेष म्हणजे त्या म्हशीने एका पारडूला जन्म दिल्यानंतर १४ महिने दूध देत होती. अशा चांगल्या म्हशीचे अपघाती निधन झाल्याने शेतकरी हतबल झाला असून त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

050921\img-20210905-wa0033.jpg

नाल्यातील पाण्यात असलेल्या पाईपात म्हैस अडकुन म्हैशीचा मृत्य

Web Title: Buffalo suffocates in Nala pipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.