चोरांचा बंदोबस्त करण्याची बीआरएसपीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST2021-07-01T04:24:39+5:302021-07-01T04:24:39+5:30
धुळे : येथील देवपूर भागात चोरीच्या घटना वाढल्या असून चोरांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्यादेखील चोऱ्या होऊ लागल्या आहेत. चोऱ्या, ...

चोरांचा बंदोबस्त करण्याची बीआरएसपीची मागणी
धुळे : येथील देवपूर भागात चोरीच्या घटना वाढल्या असून चोरांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्यादेखील चोऱ्या होऊ लागल्या आहेत. चोऱ्या, घरफोड्यांमुळे रहिवाशांना असुरक्षित वाटू लागले आहे. चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केली आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, चोरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण चोरांना पोलीस दलाचीही काही भीती नसल्याचे चित्र आहे. सामान्य नागरिकांसह, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची संपत्ती तसेच नवविवाहितांचे दागिने सर्रास लुटले जात आहेत. कोरोना महामारीमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांच्या समस्यांमध्ये चोरांची भर पडली आहे. पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
तसेच विना नंबरप्लेटच्या दुचाकींवरून भरधाव वेगाने फिरणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध मोहीम सुरू करावी. देवपूर भागात रात्रीसह दिवसादेखील गस्त वाढवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भालचंद्र सोनगत, इम्रान पठाण, नईम हिरो, रोहित चांगरे, किरण बोरसे, गुड्डू अहिरे, प्रशांत वाघ, मनीष सोहिते आदींच्या सह्या आहेत.