लाचखोर कार्यकारी अभियंत्यास अटक
By Admin | Updated: February 22, 2017 00:13 IST2017-02-22T00:13:21+5:302017-02-22T00:13:21+5:30
मनपा : 20 दिवसांपासून होता फरार

लाचखोर कार्यकारी अभियंत्यास अटक
धुळे : महापालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता अनिल पगार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील गांगुर्डे यांनी मंगळवारी महापालिकेच्या आवारातच अटक केली़ त्यांच्यावर 31 जानेवारी रोजी 12 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता़ ते गेल्या 20 दिवसांपासून फरार होत़े
महापालिकेच्या ठेकेदाराचे बांधकामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी 31 जानेवारी रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर पगार हे फरार होते. मंगळवारी ते धुळ्यात आल्याची माहिती मिळाल्याने मनपा परिसरात सापळा लावून पगार यांना दुपारी अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील गांगुर्डे व त्यांच्या पथकातील पो.हे.कॉ. जितेंद्रसिंग परदेशी, किरण साळी, पो.ना. सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडिले, सतीश जावरे, पो.कॉ. कैलास शिरसाठ यांनी कारवाई केली़