गतिरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 22:29 IST2019-04-23T22:29:20+5:302019-04-23T22:29:43+5:30
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक : कमखेडे फाट्यावर एक ठार

dhule
वर्शी : कमखेडे फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २३ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, यामुळे गतिरोधकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वर्शी गावाहून कमखेडे येथे घरी दुचाकीने जात असलेल्या मनोज हनुमंत भट (वय ४२) यांना पहाटे ३ ते ५ वाजेच्या सुमारास कमखेडा फाट्यावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही धडक ही जोरदार होती की, काही अंतरापर्यंत दुचाकी फरफटत गेली. यात दुचाकीचा पार चुराडा झाला आहे.
याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. आत्माराम माळी, पी.टी. माळी करीत आहेत.
त्यांच्या पश्चात वयोवृद्ध अपंग माता-पिता, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती.