देवपुरात पुन्हा धाडसी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:32+5:302021-07-20T04:24:32+5:30
शहरातील विविध भागात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. चोरट्यांवर पोलिसांचा ...

देवपुरात पुन्हा धाडसी घरफोडी
शहरातील विविध भागात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. चोरट्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही, अशी काहीशी स्थिती निर्माण झालेली आहे. सलग दुसऱ्यादिवशी चोरट्याने हातसफाई केल्याचे समोर आले आहे. सुभाषभाई गुजराथी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता, त्यांच्या घराचा कडी-कोयंडा, कुलूप तोडून चोरटे आतमध्ये शिरले. त्यांनी संसारोपयोगी साहित्याचे नुकसान केले. कपाटही चोरट्याने फोडले. कपाटातील दोन तोळ्याच्या बांगड्या, सहा ग्रॅमचे ब्रेसलेट, ४ ग्रॅमची अंगठी, १८ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि ५० हजार रुपये रोख असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
या घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील व पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकासह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.