सुनेसह मुलाने केली वृध्द आईला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:26 IST2019-04-30T19:26:16+5:302019-04-30T19:26:38+5:30

आनंदखेडेतील घटना : पोलिसात फिर्याद

The boy beat the old mother with his daughter | सुनेसह मुलाने केली वृध्द आईला मारहाण

सुनेसह मुलाने केली वृध्द आईला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कर्ज फे डण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून अंगावरील दागिने मागितले़ ते देण्यास नकार दिला म्हणून वयोवृध्द आईला मुलाने आणि सुनेने मारहाण केली़ ठार मारण्याची धमकी दिली़ ही घटना धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ 
याबाबत दगुबाई संपत नवसारे (६०, रा़ आनंदखेडे ता़ धुळे) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दगुबाई यांच्याकडे मुलगा धर्मराज संपत नवसारे व संगिताबाई धर्मराज नवसारे कर्ज फेडण्यासाठी पैसे दे नाहीतर अंगावरील दागिने दे असे म्हणत वाद घातला़ तिने दागिने देण्यास नकार दिला असता धर्मराजने स्वत:च्या आईला लाथाबुक्यांनी मारहाण केली़ ठार मारण्याची धमकी दिली़ 
यावेळी संंगिताबाई धर्मराज नवसारे हिने देखील धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली़ त्यावरुन दोघांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेची गावात चर्चा आहे़ 

Web Title: The boy beat the old mother with his daughter

टॅग्स :Dhuleधुळे