कामगाराच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST2021-07-14T04:41:15+5:302021-07-14T04:41:15+5:30
३ रोजी सुनील मोतीलाल बारी (४५) रा. वाल्मीकनगर शिरपूर हे मजूर शहरातील मयूर कॉलनीत प्लॉट नंबर ३७ चे घरमालक ...

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
३ रोजी सुनील मोतीलाल बारी (४५) रा. वाल्मीकनगर शिरपूर हे मजूर शहरातील मयूर कॉलनीत प्लॉट नंबर ३७ चे घरमालक आख्या फगऱ्या पावरा यांच्या दुमजली घर बांधकामाचे काम करीत होते़ संबंधित बांधकाम ठेकेदार व घरमालक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट अगर इतर सुविधा न देता कामे करून घेत होते़ तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कामाचे ठिकाणी कोणत्याही प्रकारे जाळी न बसविल्याने दुसऱ्या मजल्यावर सेंट्रिंगचे काम करणारे सुनील बारी यांचा खाली पडून मृत्यू झाला़ घरमालक व ठेकेदारांनी हलगर्जी व निष्काळजीपणा केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली़
याबाबत मयत सुनील बारी यांच्या पत्नी रत्नाबाई सुनील बारी रा. वाल्मीकनगर शिरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित ठेकेदार नाना सहादू कोळी रा. गिधाडे, ता. शिरपूर व घरमालक आख्या पावरा या दोघांविरोधात शिरपूर पोलिसात प्राणांकित अपघात भादंवि कलम ३०४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.