पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बोअरवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:45 AM2020-02-01T11:45:21+5:302020-02-01T11:46:04+5:30

महापालिका : महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत निर्णय

 Borewell to solve water problems | पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बोअरवेल

Dhule

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने आता शहरातील विविध प्रभागांमध्ये बोअरवेल तयार करण्याचा निर्णय महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत घेतला़
महापालिकेच्या दिलीप पायगुडे समिती सभागृहात शुक्रवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली़ या बैठकीला महिला व बालकल्याण सभापती निशा पाटील, उपसभापती सुमन वाघ, उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते़ याबैठकीत प्रभाग क्रं ५,६ व ११ मध्ये विविध ठिकाणी बोअरवेल करण्याबाबत फेरविचार करणे, भडक चाळ, गोकुळ नगर, सुदर्शन कॉलनी भागात बोअरवेल तसेच पाण्याच्या टाकी ठेवण्याबाबत फेरविचार करणे अशा विविध विषयांना मंजूरी देण्यात आली़ भारत सरकार तसेच आयुक्त तथा संचालनालयाच्या पत्रान्वये बाल लैगिंंक शोषणास प्रतिबंध अधिनियम अंमलबजावणी बाबतच्या कार्यालयीन अहवालास मंजूरी देण्यात आली़ बैठकीत सदस्या शंकुतला वाघ, मंगला पाटील, स्रेहल जाधव, पुष्पा बोरसे, मंगला चौधरी, मदीरा समशेर पिंजारी आदी उपस्थित होते़

Web Title:  Borewell to solve water problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे