बोगस डॉक्टर शोध मोहीम थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 13:38 IST2020-12-01T13:38:34+5:302020-12-01T13:38:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्यावर्षी बोगस डॉक्टरांनी अक्षरश: उच्छाद मांडला होता. त्यावर कारवाई झाल्यामुळे ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्यावर्षी बोगस डॉक्टरांनी अक्षरश: उच्छाद मांडला होता. त्यावर कारवाई झाल्यामुळे बऱ्यापैकी आळाही बसला. मात्र, ही मोहीम थंडावल्याने पुन्हा ह्यजैसे थेह्ण हा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू झाला असून रूग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहरासह तालुक्यात ह्यमुन्नाभाई एमबीबीएसह्ण म्हणजे बोगस डॉक्टर शोध मोहिम थंडावलेली आहे़ राज्यात बोगस डॉक्टरांचे पेव फुटल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा धडक कृती कार्यक्रम गेल्यावर्षी राबवला होता. मात्र, त्यानंतर ही कारवाई थंडावलेली दिसत आहे. गेल्या तीन वर्षात तालुक्यात ५ बोगस डॉक्टरांवर गुन्हे देखील नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर देखील बोगस डॉक्टरांचा वावर थांबलेला दिसत नाही. पश्चिम बंगालमधील काही तरूण शहरासह ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय थाटून रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. विशेषत: या डॉक्टरांना मदत करणारे कंपाऊंडरही स्वत:ला डॉक्टर समजून रूग्णांवर औषधोपचार करीत आहेत. या बोगस डॉक्टरांकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र वा वैद्यकीय पदवी नसून आदिवासी भागातील जनतेवर अघोरी, स्टेराँईड व विविध प्रकारच्या इंजेक्शन, सलाईनद्वारे उपचार करीत आहे. रूग्णांचे आजारही त्यांना लक्षात येत नाही, तरी औषधोपचार करतात. परिणामी निदान न झाल्याने रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. कमी जास्त औषध देवून रूग्णांकडून लुबाडणूक करीत आहेत. अशिक्षितांचा गैरफायदा घेत बोराडी परिसरात किमान २५ ते ३० डॉक्टर बिनधास्तपणे रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. बहुतांश डॉक्टरांकडे होमिओपॅथीची पदवी असतांनाही ते अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करीत आहेत. पथकाकडून खाजगी दवाखान्यांची तपासणी होणार, हे कळताच ह्यमुन्नाभाई एमबीबीएसह्ण डॉक्टर दवाखान्यांना कुलूप लावून काही दिवस गायब राहतात. शासन निर्णयानुसार आता बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र कमिटी आहे. फक्त तालुकास्तरीय समिती त्यास मदत करते. ग्राम समितीला देखील कारवाईचे अधिकार दिले आहेत. मात्र, तसे होत नाही. सध्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश नाहीत.
सद्यस्थितीत कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गाव व परिसरात वैद्यकीय शैक्षणिक अर्हता नसलेले बोगस डॉक्टर रुग्णांवर अॅलोपॅथी पध्दतीने उपचार करीत आहेत. गावातील ग्राम समिती सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्यामार्फत अशा वैद्यकीय व्यवसायिकांना मज्जाव करण्यात यावा. ग्रामसभा घेवून अशा लोकांवर आळा घालण्याबाबत उपाय योजना कराव्यात, गावाच्या फलकावर बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची यादी लावावी. जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल, अशा आशयाचे पत्र बीडीओंनी सरपंच, ग्रामसेवक व पोलिस पाटलांना दिले आहे.