चिनी वस्तुंवर बंदीचा दोडाईचा पालिकेचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 13:53 IST2020-06-26T13:53:11+5:302020-06-26T13:53:51+5:30
तात्काळ अमंलबजावणीचा निर्णय

चिनी वस्तुंवर बंदीचा दोडाईचा पालिकेचा ठराव
दोंडाईचा जि.धुळे : भारत देशात चीनी उत्पादने विक्री करून चीनी कंपन्या अब्जावधी रुपए कमवून त्यावरून हत्यारे बनवून त्याचा वापर आपल्याच देशाच्या सैनिकांच्या विरोधात करतो. शिवाय संपूर्ण जगाला कोरोना सारखी महामारीची उत्पत्ती देखील चीनमध्ये झाली आहे, त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून संपूर्ण जग हैराण झाले आहे. त्यामुळे चीन देशाला धडा शिकविण्यासाठी चीनी उत्पादनांवर दोंडाईचा शहरात विक्री करण्यास बंदी करण्याचा ऐतिहासिक ठराव दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नयनकुंवर्र रावल यांनी आज पालिकेची विशेष सभा घेवून केला आहे. देशात अधिकृत ठराव करून चीनी सामानांवर बंदी घालणारी दोंडाईचा नगरपालिका ही पहिलीच पालिका ठरली आहे.
आज दोंडाईचा पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या समोरील शिवाजी उद्यानात पार पाडली. तीत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले सुरवातीला चीनच्या सिमेवर शहीद झालेल्या जवानांना सभागृहात श्रंध्दाजली अर्पण करण्यात आली.