गळा आवळून तरुणाचा खून

By Admin | Updated: May 6, 2017 18:34 IST2017-05-06T18:34:24+5:302017-05-06T18:34:24+5:30

याप्रकरणी एका संशयिताविरूध्द शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

The blood threw in the neck | गळा आवळून तरुणाचा खून

गळा आवळून तरुणाचा खून

ऑनलाइन लोकमत


धुळे, दि. 6 -  शिरपूर तालुक्यातील बोरपाणी येथे भु:या ग्यानसिंग ब्राम्हणे (पावरा, वय 38 रा़ राणीमोहीदा ता़ पानसेमल जि़बडवाणी, मध्यप्रदेश) या तरुणास  मारहाण करून झाडाला दोरीने गळफास देत एकाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आह़े  याप्रकरणी एका संशयिताविरूध्द शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
 याबाबत  शिरपूर तालुका पोलिसात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती़  चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याबाबत हिरूबाई भु:या ब्राम्हणे यांनी  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भु:या बाम्हणे याला संशयित धिरू उर्फ धीरेंद्र वांगा मेहता (रा़ राणीमोहीदा) याने 25  रोजी सकाळी 11़30 ते 26 एप्रिल रोजी सकाळी मोटार सायकलीवर बसवून सोबत नेत कोठेतरी मारहाण केली़ त्याचा घातपात करून बोरपाणी शिवारातील एका झाडाला दोरीने गळफास देऊन  खून केल्याचा आरोप केला.
 याप्रकरणी संशयित धिरू मेहता याच्याविरूध्द  भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला आह़े 

Web Title: The blood threw in the neck