तऱ्हाडी येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST2021-05-03T04:30:34+5:302021-05-03T04:30:34+5:30

शनिवारी सती वानुमातेची सकाळी महारुद्राभिषेक व आरती झाली. यात्रेचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजन करण्यात ...

Blood donation camp at Tarhadi | तऱ्हाडी येथे रक्तदान शिबिर

तऱ्हाडी येथे रक्तदान शिबिर

शनिवारी सती वानुमातेची सकाळी महारुद्राभिषेक व आरती झाली. यात्रेचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. यात्रा उत्सव संस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष संतोष भामरे आश्वथात्मा मित्रमंडळ मंडळाचे अध्यक्ष सुनील भामरे यांच्या संयुक्त विद्यमानाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराचे पुजारी संतोष भामरे, योगेश चौधरी, चेतन भरटे, भाग्यश्री गिरासे, कैलास कोळी यांच्या हस्ते उत्सव संस्थान सभागृहमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४१ तरुणांनी रक्तदान केले. शिरपूर येथील स्व.मुकेशभाई पटेल ब्लड बँक, शिरपूर यांनी सहकार्य केले. जितेंद्र भामरे, मिलिंद भामरे, पंकज पाटील, सुनील भामरे, ज्ञानेश्वर भामरे, यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व गुणगौरव पत्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाजी भामरे, ज्ञानेश्वर भामरे, पंकज पाटील, जितेंद्र भामरे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camp at Tarhadi