Blood Donation Camp in the mist for 'Corona' sufferers | ‘कोरोना’ग्रस्तांसाठी धुळ्यात रक्तदान शिबिर

‘कोरोना’ग्रस्तांसाठी धुळ्यात रक्तदान शिबिर

धुळे : संपूर्ण देश कोरोना या विषाणूच्या विरोधात लढत आहे़ कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी आमदार कुणाल पाटील यांनी स्वत: रक्तदान करीत शिबिरात सहभाग नोंदविला़
आमदार कुणाल पाटील यांच्या संकल्पनेतून धुळे जिल्हा युवक काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी त्यांनी स्वत: रक्तदान केले़ युवक काँग्रेसचे राज्य सचिव राजीव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, सतिष रवंदळे यांनी रक्तदानात भाग घेतला़ याप्रसंगी बाळासाहेब भदाणे, अश्विनी पाटील, हर्षल साळुंखे, पंकज चव्हाण, लंकेश शिरसाठ, हरीष पाटील, योगेश मासुळे, सुनील मराठे, शशिकांत सूर्यवंशी, आरोग्य सेवक गोकूळ राजपूत यांच्यासह धुळे जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, जवाहर मेडीकल फाऊंडेशन रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले़
रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या तरुणांच्या आरोग्याची विशेष काळजी शिबिरात घेण्यात आली़ शिबिरस्थळी एक एक मिटरच्या अंतरावर रंगीत चौकट करुन रक्तदात्यांसाठी सोय करण्यात आली होती़ शिबिरात वारंवार सॅनीटायझर याचा वापर करुन उपस्थितांचे हात निर्जंतूनीकिरण केले जात होते़ दरम्यान, रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला़

Web Title: Blood Donation Camp in the mist for 'Corona' sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.