संत निरंकारी मंडळाच्या शिबिरात ६० दात्यांचे रक्तदान, आमदार मंजुळा गावित यांनी केले मंडळाच्या कार्याचे काैतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:53+5:302021-09-05T04:40:53+5:30

निरंकारी मंडळ आध्यात्मिक जागृतीसोबतच विविध सामाजिक उपक्रमात वर्षभर सक्रिय असते. मानव एकता दिनानिमित्त निरंकारी मंडळामार्फत रक्तदान शिबिरांचे देशभरात आयोजन ...

Blood donation of 60 donors in the camp of Sant Nirankari Mandal, MLA Manjula Gavit praised the work of the board | संत निरंकारी मंडळाच्या शिबिरात ६० दात्यांचे रक्तदान, आमदार मंजुळा गावित यांनी केले मंडळाच्या कार्याचे काैतुक

संत निरंकारी मंडळाच्या शिबिरात ६० दात्यांचे रक्तदान, आमदार मंजुळा गावित यांनी केले मंडळाच्या कार्याचे काैतुक

निरंकारी मंडळ आध्यात्मिक जागृतीसोबतच विविध सामाजिक उपक्रमात वर्षभर सक्रिय असते. मानव एकता दिनानिमित्त निरंकारी मंडळामार्फत रक्तदान शिबिरांचे देशभरात आयोजन होणे हे मानव कल्याणासाठी विशेष कार्य आहे, अशा शब्दात आमदार गावित यांनी उपक्रमाचे काैतुक केले.

अध्यक्षस्थानी निरंकारी मंडळाच्या धुळे झोनचे प्रभारी हिरालाल पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेरचे सरपंच देविदास सोनवणे, माजी सभापती संजय ठाकरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश मोहने, सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके, विद्यालयाचे अध्यक्ष संभाजी अहिरराव, प्राचार्या सोनाली पाटील, मंडळाच्या पिंपळनेर शाखेचे मुखी जगदीश ओझरकर, गणेश पाटील (शिरपूर), धुळे येथील भाऊसाहेब हिरे सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुधा मुथा, साठे, निरंकारी सेवादलाचे गणेश गुरव आदी उपस्थित होते.

संत निरंकारी सेवादल, तालुक्यातील निरंकारी भक्तांसह राजे छत्रपती स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी शिबिराचे संयोजन केले. या शिबिरादरम्यान 'गेट फिट वेलनेस परिवारा' च्या वतीने सुरेखा रासणे, विजय मावळी यांनी आरोग्य तपासणी केली.

Web Title: Blood donation of 60 donors in the camp of Sant Nirankari Mandal, MLA Manjula Gavit praised the work of the board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.