काँग्रेसच्या शिबिरात ४२ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST2021-04-17T04:36:12+5:302021-04-17T04:36:12+5:30

धुळे : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

Blood donation of 42 donors in the Congress camp | काँग्रेसच्या शिबिरात ४२ दात्यांचे रक्तदान

काँग्रेसच्या शिबिरात ४२ दात्यांचे रक्तदान

धुळे : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कोरोनाग्रस्तांसाठी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. कार्यकर्त्यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन पक्षाचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली १४ एप्रिल रोजी काँग्रेस भवनात रक्तदान शिबिर झाले. यावेळी एकूण ४२ कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, गुलाबराव कोतेकर, पंढरीनाथ पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष बानूबाई शिरसाट, विमल बेडसे, काँग्रेसचे उपाध्यक्ष के.डी. पाटील, बाजार समितीचे संचालक मुख्य प्रशासक रितेश पाटील, शिंदखेडा तालुका काँग्रेस अध्यक्ष रावसाहेब पवार, अर्जुन पाटील, झुलाल पाटील, अरुण पाटील, मुकुंद कोळवले, बापू खैरनार, किरण नगराळे, हरी चौधरी, ज्ञानेश्वर मराठे, भिवसन अहिरे, धर्मराज बागूल, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, सागर गिरासे, संदीप पाटील, विनोद गर्दे, भटू पाटील, प्रशांत पाटील, शिंदखेडा युवक काँग्रेसचे विजेंद्र झालसे, राजेंद्र खैरनार, सागर आहिरे, मनोहर पाटील, तुषार गिरासे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मुकुंद कोळवले यांच्या वतीने रक्तदात्यांना व कार्यकर्त्यांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्यसेवक गोकुळ राजपूत, तसेच जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation of 42 donors in the Congress camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.