नाकाबंदीत ५ लाख २८ हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 22:51 IST2019-10-18T22:51:08+5:302019-10-18T22:51:16+5:30
पिंपळनेर पोलिसांची कारवाई

नाकाबंदीत ५ लाख २८ हजारांचा गुटखा जप्त
पिंपळनेर : पिंपळनेर ते नवापूर रोडवर विश्व रुहाणी मानव केंद्राच्या जवळ करण्यात आलेल्या नाकाबंदीत पिंपळनेर पोलिसांनी ५ लाख २८ हजारांचा गुटखा आणि ५ लाखांचा ट्रक असा एकूण १० लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला़
शुक्रवारी अचानक नाकाबंदी लावण्यात आली होती़ सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एमएच १८ एए ४००२ हा ट्रक थांबविण्यात आला़ ट्रकची तपासणी केली असता गुटखा आढळून आला़ ही कारवाई उपअधीक्षक श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांनी केली़