धुळे : क्षुल्लक कारणावरुन महिलेवर हल्ला करीत तिच्यावर ब्लेडने वार केल्याची घटना धुळे तालुक्यातील बाळापूर-फागणे गावात गुरुवारी सकाळी घडली़ याप्रकरणी कुटुंबातील चौघांविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़धुळे तालुक्यातील बाळापूर फागणे येथील आदर्श एकता नगरात राहणारी वैशाली दगडू पाटील (३२) या महिलेने धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, रात्री कुठे झोपले होते, घरी का आले नाही अशी विचारणा या महिलेने आपल्या पतीला केली़ त्याचा राग आल्याने या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली़ वाद विकोपाला गेल्याने त्याने त्याच्या हातातील ब्लेडने तिच्यावर हल्ला केला़ यात तिला गंभीर दुखापत झाली़ ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेनंतर तिला तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत़याप्रकरणी गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार पती दगडू विनायक पाटील याच्यासह इंदूबाई विनायक पाटील, बेबाबाई रमेश अहिरे, सरला गजानन पाटील (रा़ आदर्श एकता नगर, बाळापूर-फागणे ता़ धुळे) यांच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सहायक पोलीस उपनिरीक्षक ए़ एऩ देवरे घटनेचा तपास करीत आहेत़
धुळ्यात महिलेवर ब्लेडने केले वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:51 IST