भाजपने राज्य शासनाच्या अध्यादेशाची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 01:45 PM2020-10-09T13:45:19+5:302020-10-09T13:45:42+5:30

शिंदखेडा : कृषी कायद्याबद्दल केंद्राचे आभार

BJP passed state government ordinance on Holi | भाजपने राज्य शासनाच्या अध्यादेशाची केली होळी

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : कृषीसंदर्भात केंद्र सरकारने नुकतेच तीन कायदे पारीत केले. त्याचे भाजपच्या शिंदखेडा शाखेतर्फे अभिनंदन करण्यात आले. मात्र महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा अध्यादेश काढला. त्या अध्यादेशाची भाजपतर्फे होळी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याच्या हिताचे कायदे लोकसभा व राज्यसभेतमंजूर केलेले आहेत.यामुळे नवीन कृषी क्षेत्रातील दलाली मोडीत निघणार आहे. या कायद्यानुसार बाजार समितीचे कोणतेही बंधन शेतकऱ्यांना राहणार नाही. दुसºया कायद्यात शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण असून यामुळे कृषी प्रक्रिया उद्योजक निर्यात करार करणार आहे. त्यामुळे पीक लागवडीपूर्वी शेतकरयांना भाव माहीत होणार आहे.त्यामुळे शिंदखेडा भाजपच्या वतीने अभिनंदन प्रस्ताव तहसीलदार सुनील सैदाणे यांना दिले. राज्य शासनाने हे विधेयक मान्य नाही म्हणून अध्यादेश काढला आहे. त्याची तहसील कार्यालय समोर होळी करण्यात आली. यावेळी सरचिटणीस डी.एस. गिरासे, तालुकाध्यक्ष डॉ.आर.जी. खैरनार, पंचायत समिती सदस्य प्रविण मोरे, साहेबराव गोसावी, पंचायत समिती उपसभापती नारायणसिंग गिरासे, शिंदखेडा उपनगराध्यक्ष भिला पाटील, बांधकाम सभापती प्रकाश देसले,प्रविण माळी, चेतन परमार, नगरसेवक बाळासाहेब गिरासे,दिपक चौधरी, नारायणसिंग गिरासे, भगवानसिंग गिरासे आदी उपस्थित होते.

Web Title: BJP passed state government ordinance on Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.