शिरपूर तालुक्यात भाजपने खाते उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 11:27 IST2020-01-08T11:26:35+5:302020-01-08T11:27:00+5:30
जिल्हा परिषद निवडणूक : मतमोजणीला झाली सुरुवात

शिरपूर तालुक्यात भाजपने खाते उघडले
धुळे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील मतमोजणीला बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरुवात करण्यात आली़ टप्प्या-टप्प्याने निकाल बाहेर येत आहेत़ सद्यस्थितीत शिरपूर तालुक्यातील बोराडी गटात, गणात भाजपने आपले खाते उघडले आहे़ शिरपूर तालुक्यातील बोराडी गटात जताबाई रमण पावरा, बोराडी गणात सरिता विशाल पावरा तर शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी गणात लिला नारसिंग पावरा यांना विजयी घोषीत करण्यात आले़ तसेच पळासनेर गटात भाजपच्या मोगराबाई जयवंत पाडवी, उमर्दा गणात लताबाई वसंत पावरा, तर राष्ट्रवादीच्या कमलबाई पंकज पावरा विजयी झाले आहेत़ पळासनेर गणात भाजपचे मानसिंग केऱ्या भिलाडा, काँग्रेसचे गोटीराम नारु पावरा, राष्ट्रवादीचे दत्तू गुलाब पाडवी विजयी झाले आहेत़