भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदी अनुप अग्रवाल बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 21:36 IST2019-12-29T21:35:17+5:302019-12-29T21:36:03+5:30
धुळे : एकमेव अर्ज दाखल, सलग दुसऱ्यांदा झाली निवड

Dhule
धुळे :भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदी अनूप अग्रवाल यांची रविवारी सायंकाळी फेर बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवड होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवारी सायंकाळी राम पॅलेस येथे झाली. महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी अनुप अग्रवाल यांचा एकमेव अर्ज आल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जळगावचे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.तीन वर्षांसाठी ही निवड आहे.
यापूर्वी महानगर जिल्हाध्यक्षपदी तेच विराजमान होते. त्यांची बिनविरोध निवड होताच माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
यावेळी म्महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रदिप कर्पे, विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, चंद्रकांत गुजराथी, दयानंद मेहता, लखन भतवाल, यांच्यासह महापालिकेचे भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.