लॉकडाऊन मध्ये जन्मदर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:50+5:302021-03-25T04:34:50+5:30

धुळे - शहरात लॉकडाऊनच्या काळात जन्मदर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१८ व २०१९ च्या तुलनेत २०२० साली अधिक मुले ...

Birth rate increased in lockdown | लॉकडाऊन मध्ये जन्मदर वाढला

लॉकडाऊन मध्ये जन्मदर वाढला

धुळे - शहरात लॉकडाऊनच्या काळात जन्मदर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१८ व २०१९ च्या तुलनेत २०२० साली अधिक मुले जन्माला आली आहेत. २०१९ या वर्षभरात धुळे शहरात एकूण ७ हजार ६७७ मुले जन्माला आली होती. तर २०२० मध्ये ८ हजार ४३० बालकांचा जन्म झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ७५३ बालके अधिक जन्मली आहेत.

मागील वर्षी मार्च नंतर सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. तसेच सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली होती. या काळात सर्व आस्थापना बंद होत्या. तसेच बहुतांश खाजगी रुग्णालयेही बंद होती. कोरोनाच्या भीतीने अनेक खाजगी रुग्णालयांनी उपचार बंद केले होते. याकाळात गर्भवती महिलांना अधिक त्रास झाला. एकीकडे खाजगी रुग्णालये बंद तसे कोरोनाची भीती यामुळे गर्भवती महिलांची मानसिक घालमेल वाढली होती. मात्र अशा परिस्थितीतही सुखरूप प्रसूती झाल्याने शहरातील अनेक कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

२०१९ मध्ये ३ हजार ९९६ मुले व ३ हजार ६८१ मुलींचा जन्म झाला होता. नोव्हेंबर २०१९ या महिन्यात सर्वाधिक ४२७ मुले व ३७५ मुली जन्माला आल्या होत्या.

मुलींचा टक्का कमीच..

२०२० साली शहराचा जन्मदर वाढला आहे. मात्र जन्माला आलेल्या बालकांमध्ये मुलींचा टक्का कमीच आहे. एकूण जन्माला आलेल्या बालकांमध्ये ४ हजार ४९७ मुले व ३ हजार ९३३ मुली आहेत. तसेच २०१९ मध्ये एकूण ७ हजार ६७७ बालकांचा जन्म झाला होता. त्यात ३ हजार ९९६ मुले व ३ हजार ६८१ मुलींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया -

मागील वर्षी कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खाजगी रुग्णालये बंद होती. या काळात भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेहमीपेक्षा जास्त प्रसूती झाल्या. प्रसूती सुखरूप करण्यात आमचे वैद्यकीय कर्मचारी यशस्वी ठरले. तसेच नॉर्मल प्रसुतीवर अधिक भर दिला होता.

- डॉ.अरुण मोरे, महिला विभाग हिरे वैद्यकीय महाविद्यालय

Web Title: Birth rate increased in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.