वादळ व गारपीटमुळे कोट्यावधीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:33 IST2020-03-19T12:32:52+5:302020-03-19T12:33:17+5:30
शिरपूर तालुका : मृतांची संख्या झाली दोन; आठ जनावरे मृत्यूमुखी; ४४ गावातील पिके जमीनदोस्त

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरासह तालुक्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तब्बल १३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर गारपीटमुळे आठ जनावरे मृत्यूमुखी पडली. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ४४ गावातील केळी, पपई, गहु, हरभरा, टरबूज, डांगर आदी पिके भुईसपाट झाली असून, कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे गुरूवारपासून सुरू करण्यात येणार आहेत.
शिरपूर येथे मंगळवारी झालेल्या वादळात पत्र्याचे शेड अंगावर पडून राजेंद्र धुडकू माळी यांचा मृत्यू झाला. तर सत्तरसिंग भिकेसिंग सिसोदिया (वय ५५) रा.आढे हे शिरपूरहून गावी जात असताना शिरपूर बसस्थानकाजवळ ते रिक्षेत बसले असताना मंगळवारी सायंकाळी अचानक गारपीटीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
शिरपूर तालुक्यात झालेल्या वादळीवाºयामुळे केळी, गहू पिके भुईसपाट झालेली आहेत. त्यात शिंगावे शिवारात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शिरपूर शिवारात कमी प्रमाणात नुकसान झाले आहे.
आढे शिवार
चंद्रकांत सदाशिव सोनार यांचे साडेचार एकर केळीचे अंदाजे २० ते २२ लाख, योगेश सदाशिव सोनार यांच्या साडेचार एकर शेतातील केळी, पपई पिकाचे १० लाख, भटूसिंग सुदामसिंग राजपूत यांचे सहा एकर मधील केळी व पपईचे १५ लाख, नंदु श्रावण सोनार २.५ एकरात आठ लाख, किशोर माळी यांच्या ३ एकरातील केळीचे १२ ते १५ लाख, पुंडलिक हरि पाटील ३ एकरातील केळी सात लाखाचे नुकसान झाले आहे.
शिंगावे शिवार
विजय खेमचंद धाकड यांच्या १२ एकर शेतातील पपई, डांगर, केळीचे २८ ते ३० लाखाचे नुकसान झाले आहे. याच शिवारातील शिरीष मनोहर पाटील यांच्या १५ एकरातील केळी, पपईचे ४० लाख, रमेश आनंदराव पाटील यांच्या ७ एकरातील केळी, टरबूज या पिकांचे १२ ते १५ लाखाचे नुकसान झाले आहे. विजय निळकंठ पाटील १० एकरातील केळी, पपई १२ ते १५ लाख, जयवंत फकिरा पाटील सात एकर केळी, पपईचे २० लाख, गणेश फकिरा पाटील सहा एकरातील केळी, पपईचे १२ ते १५ लाख, देविदास मोतीराम पाटील तीन एकरातील केळीचे १० लाख, चंद्रकांत नथ्थू पाटील १५ एकरातील केळी, पपईचे ३० लाखाचे नुकसान, मधुकर फकिरा पाटील आठ एकरातील केळी, पपई, २० लाख, सुरेश निळकंठ पाटील तीन एकर केळीचे सात लाख, दीपक पाटील तीन एकर केळी सात लाख, महेश अरविंद माळी आठ एकर केळी २० लाख, निलेश साहेबराव पाटील चार एकर केळी आठ लाख, गुलाब निंबा पाटील सहा एकर केळी १५ लाख, रिंकू पाटील तीन एकर केळी आठ लाख, चंद्रकांत पाटील तीन एकरातील केळी सात लाखाचे नुकसान झाले आहे. दिवान आनंदराव पाटील तीन एकरातील केळी आठ लाख, तर धिरज शंभु पाटील यांच्या तीन एकरातील केळीचे आठ लाखाचे नुकसान झाले आहे.
हिंगोणी शिवार
रवींद्र भाईदास पाटील तीन एकरातील आठ लाखाचे नुकसान, विनोद नामदेव पाटील तीन एकर केळी ८ लाख, मिलिंद पाटील तीन एकर केळी सात लाख, रणजित सुभाष पाटील तीन एकर केळी पाच लाख, मनोहर परबत पाटील चार एकरातील केळी १२ लाख, कुंदन पाटील चार एकर केळी १२ लाख, प्रमोद पाटील तीन एकर केळी आठ लाख, चंद्रकांत भास्कर पाटील अडीच एकरातील केळी आठ लाख, रावसाहेब पाटील अडीच लाख एकरातील केळीच्या पिकांचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिरपूर शिवार
शिरपूर शिवारातील मनोज प्रदिप बाविस्कर यांच्या १६ एकरातील केळी व पपई पिकाचे २५ लाखाचे नुकसान झाले आहे. श्रीलाल शर्मा यांच्या तीन एकर मधील केळीचे आठ लाखाचे तर जितेंद्र पोतदार यांच्या तीन एकरातील केळीचे आठ लाखाचे नुकसान झाले आहे.
राजेंद्र गुलाबसिंग गिरासे यांचे अजंदे शिवारातील सेडनेट मधील पपई रोपांचे नुकसान होऊन ६० ते ७० लाखांचे नुकसान झाले तसेच चार एकर केळी व पाच एकरातील कांद्याचे नुकसान झाले.तहसील कार्यालयातील कालच्या वादळामुळे तहसील कार्यालयातील डोमचा पत्रा उडून मोठे नुकसान झाले.
शिरपूर शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाशेजारी झाड पडल्यामुळे कार्यालयाचे नुकसान झाले. तर शिरपूर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या झाडांच्या फाद्यांमुळे कौलांचे नुकसान झाले तसेच वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. शिरपूर येथील विश्वासराव रंधे क्रीडा संकुलाचा पत्रा उडून नुकसान झाले आहे. वादळामुळे जि.प. शाळेतील कौलांचे नुसान झाले. त्यामुळे वर्गखोल्यांचे नुकसान झाले आहे.शिरपूर शहरातील रामसिंग नगरात नुकसानग्रस्त लोकांची जेवणाची व्यवस्था भूपेशभाई पटेल यांनी चोपडा जीन आश्रमशाळेत केली होती. काही कुटुंबांना त्यांनी धान्याचा साठा दिला. कळमसरे येथे चारण समाजाचे लोक झोपड्या करुन राहतात. वादळी पावसामुळे झोपड्या उडून गेल्या त्यांचा संसार उघड्यावर पडला. विजपुरवठा खंडीत असल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली. भूपेशभाई पटेल यांनी तातडीने पाण्याचे टँकर पाठवून सुविधा उपलब्ध करुन दिली.
शिवसेनेकडून पाहणी
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, उपाध्यक्ष हिंमत महाजन, एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू टेलर, तालुका प्रमुख भरत राजपूत, शहर प्रमुख मनोज धनगर, कुबेर जमादार आदींनी नुकसानग्रस्त गावांची पाहणी करुन तहसीलदार आबा महाजन यांची भेट घेतली.
दरम्यान हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा हतबल झाला आहे.