आनंदखेडे शिवारात ट्रकने दुचाकीस्वाराला उडविले; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Updated: November 8, 2023 17:50 IST2023-11-08T17:49:47+5:302023-11-08T17:50:03+5:30
भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने समोर चालणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

आनंदखेडे शिवारात ट्रकने दुचाकीस्वाराला उडविले; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
धुळे : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने समोर चालणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर आनंदखेडे शिवारात मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झाला. सीताराम यादव बोरसे (वय ५८, रा. चौगाव,ता. धुळे) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याप्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अपघातानंतर चालक वाहन सोडून फरार झाला. सीताराम बोरसे हे साक्रीकडून दुचाकीने (क्र. एमएच १८ एजी ००२८) धुळ्याकडे येत होते. आनंदखेडे शिवारात नायरा पेट्रोलपंपासमोर मागून येणाऱ्या ट्रकने (क्र. टीएन ३४ डब्ल्यू १९५०) दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सीताराम बोरसे हे मयत झाले.
अपघातानंतर चालक वाहन सोडून फरार झाला. याप्रकरणी संदीप बोरसे (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस स्टेशनला ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक धनवटे करीत आहेत.