धुळे : कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारातील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: April 9, 2023 18:56 IST2023-04-09T18:56:40+5:302023-04-09T18:56:49+5:30

भरधाव वेगाने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक बसली.

Bike rider killed in collision with car Incident in Palasner Shivara of Shirpur taluka | धुळे : कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारातील घटना

धुळे : कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारातील घटना

धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद रात्री ११ वाजता करण्यात आली. राहुल रूमसिंग पावरा (वय २७, रा. पळासनेर, ता. शिरपूर) हा दुचाकीने (एमपी १३ डीक्यू ०४६८) मुंंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गाने शिरपूरकडून सेंधव्याकडे जात होता.

पळासनेर गावाच्या पुढे भिलाटीबाबा मंदिराजवळून त्याची दुचाकी जात असताना कारची (एमएच १८ बीआर ७६९२) दुचाकीला धडक बसली. अपघाताची ही घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर राहुल पावरा हा तरुण महामार्गावर फेकला गेला. त्याच्या डोक्यासह हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने शिरपूर येथील काॅटेज हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले. उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात रात्री अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Bike rider killed in collision with car Incident in Palasner Shivara of Shirpur taluka