लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:11 IST2019-11-06T23:10:50+5:302019-11-06T23:11:23+5:30
शिरपूर : आईला भेटण्यास आला असतांना घडली घटना

dhule
शिरपूर : तालुक्यातील जामन्यापाडा येथे ४० वर्षीय मोठा मुलगा आईला भेटायला आला होता़ त्याचा राग येवून सख्खा लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने वार करून ठार केल्याची घटना घडली़
४ रोजी संध्याकाळच्या सुमारास जामन्यापाडा गावात ही घटना घडली़ वांगऱ्या बठळया पावरा (३०) हा पत्नी नरम्याबाई व आई सायजाबाई हिच्यासह जामन्यापाडा येथे कुटुंबासह उदरनिर्वाह करतो़ वांगºया यास भिकला, जिकला व कांजºया असे ३ भाऊ आहेत़ भिकला व कांजºया हे दोघे गावात राहतात तर जिकला हा वºहाड ता़चोपडा जि़जळगांव येथे गेल्या ४-५ वर्षापासून त्याची पत्नी धोकीबाईसह दोघे उदरनिर्वाह करीत होता़
४ रोजी वांगºया यांचे असरापाणी ता़वरला जि़बडवाणी येथील नातेवाईकांकडे कार्यक्रम असल्यामुळे तेथे जिकला व त्याची पत्नी धोकीबाई भेटलेत़ कार्यक्रम आटोपून ते दोघे पती-पत्नी जामन्यापाडा येथे आईला भेटण्यास निघून गेलेत़
दरम्यान, सायंकाळी ६़३० वाजेच्या सुमारास जिकला व त्याची आई सायजाबाई हे दोघे गप्पामारीत असतांना वांगºया हा घरी पोहचला़ हातपाय धुत असतांना अचानक ओरडण्याचा आवाज आला, ते पाहण्यासाठी वांगºया हा घराबाहेर पडला़ त्यावेळी त्याचा तीन क्रमांकाचा भाऊ कांजºया पावरा (३२) याने दोन क्रमांकाचा भाऊ जिकला पावरा (४०) याच्या छातीवर सपासप चाकूने वार करीत असतांना तो हिसकाविण्याचा प्रयत्न करीत असतांना तो चाकू दाराजवळ सोडून शेताच्या दिशेने पळ काढला़ त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता मात्र अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला़
दरम्यान, जखमी अवस्थेत जिकला हा रक्तबंबांळ होवून बेशुध्द पडला होता़ त्यास उपचारासाठी येथे आणत असतांना त्याचा रस्त्यावरच मृत्यु झाला़ मयत अवस्थेत येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़
याबाबत वांगºया पावरा याने दिलेल्या फिर्यादीनुसार, जिकला बठळ्या पावरा हा पत्नीसह आई सायजाबाई वठडा पावरा हिला भेटण्यासाठी आला होता़ त्याचा राग आल्याने कांजºया बठळ्या पावरा (३२) याने मोठा भाऊ जिकला बठळ्या पावरा (४०) याच्याशी वाद घालून खून केल्याची घटना घडली़ याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ संशयित आरोपी फरार असून त्याचा शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत़ पुढील तपास सपोनि अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक वारे करीत आहे़