साक्रीत अपंग व्यक्तीला सायकल भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:14 IST2020-03-16T12:13:39+5:302020-03-16T12:14:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क साक्री : शहरातील बोरबंद भिलाटीतील यशवंत मालचे यांचा गँगरीन झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी एक पाय कापावा लागला ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : शहरातील बोरबंद भिलाटीतील यशवंत मालचे यांचा गँगरीन झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी एक पाय कापावा लागला होता. त्यामुळे त्यांना चालणे, फिरणे अशक्य झाले होते. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून त्यांना तीनचाकी सायकल भेट देण्यात आली.
याप्रसंगी भाजपचे साक्री तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, साक्री पं.स.चे माजी सदस्य उत्पल नांद्रे, बापू गीते, शैलेंद्र अजगे, राकेश दहिते, योगेश भामरे, विजय भोसले, धनराज चौधरी, दिलीप विसपुते, हरीश भोसले, शेख अकबर शेख फत्तू, शंकर गोयकर, शशिकांत भोसले, कल्याण भोसले, नदीम पठाण, गोपा ठाकरे, राजू सोनवणे, गोविंदा चौधरी, शशिकांत अहिरराव, योगेश चौधरी, शिवाजी देवरे, मच्छिंद्र मालचे, कैलास महाले, सोनू गोयकर, संदीप शेवाळे आदी उपस्थित होते.