Bibeta attack kills 3 sheep in Sachri taluka | साक्री तालुक्यातील इच्छापुर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ७१ मेंढ्या मृत्यूमुखी

Dhule

साक्री साक्री तालुक्यातील इच्छापुर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ७१ मेंढ्या ठार झाले आहेत धुळे सुरत महामार्गालगत असलेल्या इच्छापुर शिवारात मेंढपाळांचा वाडा पडलेला होता रात्रीच्या सुमारास दोन बिबट्यांनी या वाड्यावर हल्ला चढवला असता त्यात ७१ मेंढ्या ठार झाले आहे़ यावेळेस वाड्यावर झोपलेल्या माणसांनी बिबट्यांच्या भीतीने तेथून पळ काढला सकाळी गावकरी तेथे एकत्र आल्यावर मृत मेंढ्यांचा खच पडलेला होता़ या नुकसानीमुळे संबंधित मेंढपाळांनी आक्रोश केला़ यामध्ये इच्छापुर येथील गोबा शिवा रुपनर, गोपू शिवा रुपनर, प्रकाश रघुनाथ मारणर व अनिल दलपत माळचे यांच्या मेंढ्या ठार झाल्या आहेत़ यापूवीर्ही बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक मेंढ्या मरण पावल्या आहेत या सर्व नुकसानग्रस्त मेंढपाळांना नुकसानभरपाई देण्याची मागणी मेंढपाळांनी केली आहे़ टनास्थळी वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली़

Web Title: Bibeta attack kills 3 sheep in Sachri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.