भाईजी नगरातील रस्ते कॉंक्रिटीकरणासह हायमास्ट कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST2021-02-14T04:33:50+5:302021-02-14T04:33:50+5:30
आमदार शाह यांनी निवेदनाची दखल घेत भाईजी नगर भागाची पाहणी केली. आमदार स्थानिक विकास निधीतून रस्ता व गटारी कॉंक्रिटीकरणाचे ...

भाईजी नगरातील रस्ते कॉंक्रिटीकरणासह हायमास्ट कामाचे भूमिपूजन
आमदार शाह यांनी निवेदनाची दखल घेत भाईजी नगर भागाची पाहणी केली. आमदार स्थानिक विकास निधीतून रस्ता व गटारी कॉंक्रिटीकरणाचे आश्वासन दिले होते. तसेच भाईजी नगर आणि जिरेकर नगर येथील राणीसती मंदिराजवळ ओपन स्पेस येथे नवरात्र आणि विविध धार्मिक कार्यक्रमात भाविकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था व हायमास्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कामाच्या उद्घाटन आमदार फारूक शाह, नगसेवक युसुफ मुल्ला, नासीर पठाण, भाईजी नगर गृहनिर्माण संस्थाचे चेअरमन प्रवीण अग्रवाल, विनय कोटेचा, मुन्ना अग्रवाल, कैलास गर्ग, मुकेश सोनार, मनोज शर्मा, शैलेश अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, मयूर अग्रवाल, दिलीप अग्रवाल, संजय शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, लीना काटे, वाडीले काकू, निमा काकड, राणी अग्रवाल, युवा जिल्हाध्यक्ष सेहबाज शाह, आसिफ पोपट शाह, आसिफ शाह आदींसह कार्यकर्ते व भाईजी नगर भागातील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.