आंबे येथे आज श्रीराम मंदिराचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:18+5:302021-01-17T04:31:18+5:30
आंबे रविवारी येथे १७ जानेवारी रोजी सकाळी ८.३४ ते ११.३० वाजेपर्यंत श्रीराम, जानकी, लक्ष्मण, हनुमान यांच्या मूर्तींचा कलाकर्षण विधी ...

आंबे येथे आज श्रीराम मंदिराचे भूमिपूजन
आंबे रविवारी येथे १७ जानेवारी रोजी सकाळी ८.३४ ते ११.३० वाजेपर्यंत श्रीराम, जानकी, लक्ष्मण, हनुमान यांच्या मूर्तींचा कलाकर्षण विधी व सकाळी ११.३० ते १२.४१ वाजता श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होईल. यावेळी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत महाप्रसाद कार्यक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
सर्व कार्यक्रम शिरपूर-वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व कृतिबेन भूपेशभाई पटेल (श्रीराम, कृष्ण उपासक) यांच्या हस्ते संपन्न होतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार काशिराम पावरा राहतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोहिणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य कैलास पावरा, आंबे गण पंचायत समिती सदस्य दिनेश पावरा, रोहिणी गण पंचायत समिती सदस्य बागल्या पावरा उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आंबे परिसरातील ग्रामस्थ यांनी केले आहे.