सोनगीर येथे जलकुंभाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 22:39 IST2020-07-16T22:38:54+5:302020-07-16T22:39:28+5:30
३० लाखांचा निधी मंजूर : पाणीप्रश्न सुटणार

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : ग्रामपंचायतीची मुदत पुढील महिन्यात संपत असल्याने, तत्पूर्वीच विकास कामे उरकण्याचा सपाटा सुरू झालेला आहे. १४ रोजी चौदाव्या वित्त आयोगाच्या सुमारे ३० लाख रुपये खर्चाच्या निधीतून दोन लाख लिटर पाणी क्षमता असलेल्या जलकुंभाचे भूमिपूजन पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून गावाच्या पश्चिम भागात जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक्र सहा जवळील एक टेकडीवर दोन लाख लिटर पाणी क्षमता असलेला जलकुंभ बांधण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर यासाठी बांधकाम वीजपंप, जलवाहिनी व इतर असा सुमारे तीस लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाल्यानंतर १४ रोजी जलकुंभाचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी उपसरपंच धनंजय कासार, ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे, पंचायत समितीचे माजी सदस्य चेतन चौधरी, भाजपचे तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, प्रेमल पटेल, विशाल मोरे, किशोर पावनकर, हेमंत सोनार, पराग देशमुख, संदीप गुजर, राजूलाल भिल, शेखर परदेशी, दीपक भोई आदी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.