बोरकुंड-रतनपुरा गटात विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:41 IST2021-08-14T04:41:31+5:302021-08-14T04:41:31+5:30

या कार्यक्रमास प्रदेश काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावित, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, ...

Bhumi Pujan of development works in Borkund-Ratanpura group | बोरकुंड-रतनपुरा गटात विकासकामांचे भूमिपूजन

बोरकुंड-रतनपुरा गटात विकासकामांचे भूमिपूजन

या कार्यक्रमास प्रदेश काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावित, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख आधार हाके, संघटक विलास चौधरी, देवराम माळी, तालुकाप्रमुख धनराज पाटील, चंद्रकांत म्हस्के, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यात जिल्हा परिषद, धुळेच्या माध्यमातून विविध कामे मंजूर झाली आहेत. बोरकुंड ते तरवाडे रस्ता डांबरीकरण, तरवाडे ते लोंढरे रस्त्यावर तळफरशी बांधकाम, विंचूर फाटा ते विंचूर रस्ता डांबरीकरण, नाणे ते रा. मा. २११ रस्ता डांबरीकरण, मांडळ ते मांडळफाटा रस्ता डांबरीकरण यांसह २० कामांसाठी तब्बल २८५ लाख रुपये मंजूर आहेत. या कामांच्या भूमिपूजन समारंभास उपस्थितीचे आवाहन बोरकुंडचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शालिनी बाळासाहेब भदाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देविदास माळी आणि प्रभाकर पाटील, पंचायत समितीचे सदस्य देवेंद्र माळी आणि बाबाजी देसले, आदींनी केले आहे.

Web Title: Bhumi Pujan of development works in Borkund-Ratanpura group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.