शिरपूर पॅटर्न अंतर्गत २४१ व्या बंधाऱ्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 15:39 IST2020-06-11T15:38:23+5:302020-06-11T15:39:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : तालुक्यातील भाटपुरा-सावेर गावा दरम्यान ‘शिरपूर पॅटर्न’ अंतर्गत २४१ व्या बंधाºयाचे भूमिपूजन तालुक्याचे आमदार काशीराम ...

Bhumi Pujan of 241st dam under Shirpur pattern | शिरपूर पॅटर्न अंतर्गत २४१ व्या बंधाऱ्याचे भूमिपूजन

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील भाटपुरा-सावेर गावा दरम्यान ‘शिरपूर पॅटर्न’ अंतर्गत २४१ व्या बंधाºयाचे भूमिपूजन तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल उपस्थित होते.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष के.डी. पाटील, जि़प़सदस्य प्रा़संजय पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती प्रकाश चंपालाल चौधरी, भाटपुरा सरपंच शैलेंद्र चौधरी, पिळोदा माजी सरपंच योगेश पाटील, अनारसिंग जाधव, दरबार वंजारी, इंजिनीयर पी.बी.पाटील, मंगल गुजर, वसंत नारायण पाटील, वसंत पोलाद जाधव, तोताराम वंजारी, पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, भू-वैज्ञानिक दिनेश जोशी उपस्थित होते.
भाटपुरा-सावेर गावादरम्यान पोलिस चौकीजवळ नदीच्या नाल्यावर शिरपूर पॅटर्न बंधाºयाचे भूमिपूजन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात आले. आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थही मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of 241st dam under Shirpur pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे