शिंदखेडा उपनगराध्यक्ष पदी भिला माळी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 12:11 IST2019-02-17T12:08:33+5:302019-02-17T12:11:12+5:30
भाजपच्या उमेदवाराला ९ तर कॉँग्रेस उमेदवारास ६ मते

शिंदखेडा उपनगराध्यक्ष पदी भिला माळी विजयी
लोकमत आॅनलाईन
शिंदखेडा : येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे भिला बारकू माळी विजयी झाले. त्यांना ९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी कॉँग्रेसचे उदय देसले यांना ६ मते मिळाली. नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्य पदाच्या दोन रिक्त जागांवर भाजपचे राजेंद्र हिंमतराव भामरे व कॉँग्रेसचे युवराज खैरनार यांची निवड करण्यात आली.
नगराध्यक्षा रजनी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी १५ नगरसेवक उपस्थित होते तर दोन गैरहजर राहिले. त्यात सपाचे नगरसेवक विजयसिंग नथेसिंग राजपूत व साजेदाबी इंद्रिस कुरेशी यांचा समावेश होता.
उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीनंतर नगराध्यक्ष रजनी वानखेडे यांच्याहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.