भावसार समाजाचा जनआक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:12 IST2020-02-25T12:12:25+5:302020-02-25T12:12:45+5:30
धुळे : अल्पवयीन मुलीवरील लैंगीक अत्याचाराच्या घटनेचा निषेध

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आंध्रप्रदेशातील कर्नुल येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगीक अत्याचाराचा तिव्र शब्दात निषेध करीत भावसार समाजातील महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला़
सदर घटनेचा तिव्र शब्दात निषेध करीत या गुन्ह्याचे कामकाज जलदगती न्यायालयात करावे, अशी मागणी केली़
या घटनेतील संशयित शेख ख्वाजा शेख करीम याला देहदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़
मोर्चात रविंद्र वसंतराव भावसार, रमणलाल मांगिलाल भावसार, शिवदास मगन भावसार, उमा दिनेश भावसार, सुरेखा शिवदास भावसार, माधुरी योगेंद्र जुनागडे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या़