भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, तरुणाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 22:38 IST2021-02-15T22:38:11+5:302021-02-15T22:38:24+5:30
अपघाताची ही घटना सोमवारी दुपारी घडली

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, तरुणाचा जागीच मृत्यू
धुळे : शहरातील चाळीसगाव रोडलगत शंभरफुटी रस्त्यावर भरधाव वेगाने येणारी दुचाकी दुभाजकावर आदळली. अपघाताची ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलिसांनी धाव घेत होती. धुळे तालुक्यातील बोरविहिर येथील सोनू वाल्मिक पगारे (२३) हा तरुण धुळ्यात काही कामानिमित्त आलेला होता. चाळीसगाव रोडलगत शंंभर फुटी रोड असून या ठिकाणी दुभाजक आहे. भरधाव वेगात असलेल्या या तरुणाकडून चालवित असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने दुभाजकाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की तो याच ठिकाणी असलेल्या एका खांबाला त्याची धडक बसली. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. अपघात होताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरीकांनी गर्दी केली होती. अपघात झाला असून तरुण गंभीर असल्याची माहिती येथून जवळच असलेल्या चाळीसगाव रोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तरुणाला उचलले आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषीत केले. अपघाताची प्राथमिक नोंद चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.