मालपूरला भागवत कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:43 IST2020-03-06T12:42:59+5:302020-03-06T12:43:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे तुकाराम महाराज बीजनिमित्त श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन ...

Bhagwat story to Malpur | मालपूरला भागवत कथा

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे तुकाराम महाराज बीजनिमित्त श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ५ पासून दररोज ८ ते १० या वेळेत नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम असे पहाटे ४ ते ५ प्रभातफेरी, ५ ते ६ काकड आरती व सकाळी ८ ते १० व दुपारी २ ते ४ ह.भ.प. बबन महाराज महाले जळगावकर भागवत कथेचे निरुपण करतील. सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० हरिकीर्तन.
१२ मार्च ह.भ.प. रामचंद्र महाराज यांचे काल्याचे कीर्तन होवून ११ वाजेपासून महाप्रसादास सुरुवात होईल.
संत तुकाराम महाराज बीज निमित्त ११ मार्च रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान ह.भ.प. नारायण महाराज मालपूरकर यांचे कीर्तन होईल.
या सप्ताहाचे आयोजक संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान मालपूर असून यासाठी संत सावता महाराज दत्तप्रासादीक, पाताळेश्वर हरिपाठ मंडळ, प्रभातफेरी महिला मंडळ व भजनी मंडळाचे सकार्य लाभणार आहे.

Web Title: Bhagwat story to Malpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे