पावसाळ्यात सापांपासून सावधाऩ़़! धुळे जिल्ह्यात विषारी सापांच्या केवळ सहा प्रजाती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST2021-06-17T04:24:59+5:302021-06-17T04:24:59+5:30

धुळे जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण लक्षात घेतल्यास साप निघणे आणि तो चावल्यानंतर मृत्यू होण्याच्या घटना तशा जिल्ह्यात नगण्यच ...

Beware of snakes in the rainy season! Only six species of venomous snakes in Dhule district! | पावसाळ्यात सापांपासून सावधाऩ़़! धुळे जिल्ह्यात विषारी सापांच्या केवळ सहा प्रजाती!

पावसाळ्यात सापांपासून सावधाऩ़़! धुळे जिल्ह्यात विषारी सापांच्या केवळ सहा प्रजाती!

धुळे जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण लक्षात घेतल्यास साप निघणे आणि तो चावल्यानंतर मृत्यू होण्याच्या घटना तशा जिल्ह्यात नगण्यच आहे. जे काही साप निघतात, ते पावसाळ्याच्या काळात आणि शेतात निघत असल्याचे जाणवते. साप चावल्यानंतर लागलीच रुग्णाला दवाखान्यात नेण्याची आवश्यकता आहे. रुग्णालयात सद्यातरी अ‍ॅन्टी स्रेक व्हेनम नावाचे औषध उपलब्ध आहे. ते दिल्यानंतर साप चावलेल्या व्यक्तीला तसा फरक पडतो. ही लस प्रत्येक रुग्णालयात असणे आवश्यक आहे. त्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर त्याची आवश्यकता आहे़

साप चावला तर

- आपल्याला साप चावला हे लक्षात येताच सर्वांत अगोदर अजिबात घाबरून जाऊ नये. त्या सापाचा तत्काळ आपल्या मोबाईलवर फोटो काढावा.

- जेणेकरून तो साप हा विषारी आहे की बिनविषारी हे डॉक्टरांना दाखविण्यासाठी सुलभ होऊ शकते. डॉक्टरांना उपचार करणे सोईचे ठरेल.

- त्याचप्रमाणे आपल्या परिसरात असलेल्या सर्पमित्रांना तो फोटो दाखवून त्यांनाही कळू शकेल की हा साप विषारी आहे की बिनविषारी आहे.

- साप चावल्यानंतर लागलीच रुग्णाला दवाखान्यात न्यायला हवे. साप चावलेल्या व्यक्तीला इतरांनी धीर देण्याची आवश्यकता आहे.

साप आढळला तर

- आपल्या परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता त्वरित तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना बोलवा. ते येईपर्यंत सापावर लांबून नीट लक्ष ठेवा.

- सर्पमित्रांना तो साप शोधण्यात अनेक अडचणी येतात. साप निघालेल्या ठिकाणी गर्दी करू नये. त्याला मारण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.

- साप हा निसर्गातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. सापाच्या लाळेचा अनेक प्रकारच्या औषधांसाठी उपयोग होत असल्याची बाब महत्त्वपूर्ण आहे.

- आपल्या परिसरात निघाणारे साप हे सर्वाधिक बिनविषारी असल्याने त्याच्याबद्दल भीती अथवा अंधश्रद्धेपोटी त्याची अवहेलना कोणीही करू नये.

नाग :- या सापाला आपण सर्वजण चांगल्याप्रकारे ओळखतो. हा साप त्याच्या जिवाला धोका वाटल्यावर फणा काढतो. बऱ्याच वेळा फुत्कारतो देखील. त्यामुळे या सापाला ओळखणे खूपच सोपे आहे.

मण्यार :- रात्रीच्यावेळी आढळणारा हा साप पाली किंवा इतर छोटे साप खाण्यासाठी आपल्या परिसरात येतो. संपूर्ण काळा असणारा साप. याच्या पाठीवर आडव्या पांढऱ्या रंगाच्या रेषा किंवा पट्टे असतात.

घोणस :- जवळपास अजगरासारखा दिसणारा हा साप पिवळसर तपकिरी रंगाचा असतो व भक्ष्याच्या शोधात आपल्या परिसरात येतो. या सापाच्या पाठीवर रुद्राक्षासारखी अंडाकृती आडवी नक्षी असते.

फुरसे :- आकाराने लहान असलेला हा विषारी साप तपकिरी रंगाचा असतो व त्याच्या डोक्यावर बाणाच्या आकाराची नक्षी असो. जिवाला धोका जाणवल्यावर आपल्या अंगाला अंग घासून आवाज काढतो.

जिल्ह्यात आढळणारे

बिनविषारी साप

सद्याच्या स्थितीत जिल्ह्यात अनेक प्रकारचे लहान-मोठे साप निघत असतात. त्यात धामण, गवत्या, तस्कर, कवड्या यासारख्या बिनविषारी सापांचा समावेश आहे. या सापांपासून आपल्या जीविताला धोका नसला तरी देखील त्याला घाबरण्याचे प्रमाण मात्र वाढतेच आहे.

सर्पमित्राचा कोट

वेगवेगळ्या प्रजातीचे साप आपल्या परिसरात दिसून येतात. भीती आणि अंधश्रद्धपोटी आपल्याकडून त्यांची अवहेलना होते. बऱ्याचवेळा ते मारले देखील जातात. खरंतर आपल्या परिसरात आढळणाऱ्या सापांपैकी ८५ टक्के साप हे बिनविषारी असतात. ते पर्यावरणासाठी उपद्रवी नसून, उपयोगीच आहेत.

रोहित कुलकर्णी, सर्पमित्र

Web Title: Beware of snakes in the rainy season! Only six species of venomous snakes in Dhule district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.