अतिक्रमण धारकांवर कारवाईची कुºहाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:15 IST2019-11-20T23:14:41+5:302019-11-20T23:15:01+5:30
महापालिका : चौथ्या दिवशीही कारवाई: जेसीबीद्वारे अनाधिकृत बांधकाम केले बंद

Dhule
धुळे : शहरातील आग्रारोडसह अन्य मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर बुधवारी सलग चौथ्या दिवशी कारवाईची कुºहाड कोसळली़ व्यावसायिकांचे साहित्य जप्त करीत कारवाई केली़
जेसीबीद्वारे हटविले अतिक्रमण
महापालिका अतिक्रमणनिर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी मालेगावरोडवरील शब्बीर नगर, शंभर फुटीरोड येथील नागरिकांच्या तक्रारीनुसार उस्मान फराईम यांनी मनपाच्या जागेवर अनाधिकृतपणे धार्मिक स्थळ बांधून अतिक्रमण केले होते़ त्यामुळे सार्वजनिक जागा अडविल्याने परिसरात वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो़ त्यामुळे अधिकाºयांनी जेसीबी यंत्राव्दारे हे अतिक्रमण काढण्यात आले़