नामसप्ताह महोत्सवात भाविकांना ऑनलाईन कीर्तनाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST2021-09-12T04:41:23+5:302021-09-12T04:41:23+5:30
या वर्षी १९३ वा नामसप्ताह महोत्सव साध्या पद्धतीने होत असून, मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांनी नागरिकांना आवाहन करीत कळविले ...

नामसप्ताह महोत्सवात भाविकांना ऑनलाईन कीर्तनाचा लाभ
या वर्षी १९३ वा नामसप्ताह महोत्सव साध्या पद्धतीने होत असून, मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांनी नागरिकांना आवाहन करीत कळविले होते. मंदिरात दैनंदिन कार्यक्रम छोट्या पद्धतीने होत आहेत. रोज आरती, हरिपाठ नामजप तर रात्री काही भाविकांच्या उपस्थितीत आरती व कीर्तन होत आहे. मंदिरात दरवर्षी रात्री आरतीसाठी व कीर्तनासाठी मोठी गर्दी होत असे; पण या वर्षी मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांनी कोरोना संसर्ग आजाराचा प्रसार रोखण्यासाठी व शासकीय नियम पाळीत मंदिरात गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. दरवर्षीप्रमाणे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम कमी लोकांमध्ये होत आहेत; तर भाविकांसाठी मंदिर दर्शन दिवसभर खुले ठेवले आहे; तसेच कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी झूम ॲपचा वापर करीत रोज कीर्तनाचा लाभ भाविक घरी बसून घेत आहेत. याचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. शांततेने या वर्षाचा नामसप्ताह उत्सव मंदिरात होत आहे.
तसेच नामसप्ताह यात्रा उत्सवातील या वर्षी सर्व कार्यक्रम यात पायदळी सोंग, कुस्ती स्पर्धा, पारंपरिक नृत्य स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.