अंत्योदय अन्न योजनेचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 22:52 IST2020-02-05T22:52:05+5:302020-02-05T22:52:30+5:30
निदर्शने : दिव्यांग बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़
जिल्ह्यातील दिव्यांग महिला आणि पुरूष निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते़ यावेळी महसूलचे उपजिल्हाधिकारी यांनी खाली येवून दिव्यांग बांधवांचे निवेदन स्विकारले़ दिव्यांग व्यक्तींचा अंत्योदय अन्न योजनेत समावेश करावा, अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका देवून त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला अन्न योजनेचा लाभ नियमीत मिळावा, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प तसेच कायमस्वरुपी व्हीलचेअरची व्यवस्था करावी, चारही तालुक्यांच्या तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी करणाºया विभागांचे रॅम्पजवळ स्थलांतर करावे, दिव्यांग बांधवांना कार्यालयांमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़ निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत बोरसे, मंदाकिनी गायकवाड, संजय विभांडीक, पंकज सिसोदिया, दिलीप दगडे, संजय सरग, जयेश बावा, भुषण अहिरे, शितल चव्हाण, सरला खैरनार, धुळु लकडे, छोटू पठाण, अनिता थोरात, अनु मालचे, वासुदेव चव्हाण, प्रल्हाद पाटील, राजु आदींच्या सह्या आहेत़