मनपाच्या ‘कोविड सहाय्यता कक्षा’तून मिळणार बेडची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST2021-04-08T04:36:21+5:302021-04-08T04:36:21+5:30

याप्रसंगी अति.आयुक्त गणेश गिरी, सहायक आयुक्त शांताराम गोसावी, आरोग्याधिकारी डॉ.महेश मोरे, डॉ.प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल, गणेश जाधव, ...

Bed information can be obtained from the Corporation's 'Covid Assistance Room' | मनपाच्या ‘कोविड सहाय्यता कक्षा’तून मिळणार बेडची माहिती

मनपाच्या ‘कोविड सहाय्यता कक्षा’तून मिळणार बेडची माहिती

याप्रसंगी अति.आयुक्त गणेश गिरी, सहायक आयुक्त शांताराम गोसावी, आरोग्याधिकारी डॉ.महेश मोरे, डॉ.प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल, गणेश जाधव, डॉ.जे.सी.पाटील आदी उपस्थित होते.

शहरातील व जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेमार्फत विविध उपाययोजना व कार्यवाही युध्दपातळीवर केली जात आहे. त्यासाठी विविध स्तरातून आवश्यक ती यंत्रणा व पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खाजगी रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच शुल्क आकारावे, यासाठी महापालिकेने भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. तसेच शहरातील शासकीय कोविड हॉस्पिटल व मनपा कोविड हेल्थ सेंटर, खाजगी कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरमधील शिल्लक बेडची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी आयुक्तांनी समन्वयक अधिकार्‍यांची नेमणूक यापूर्वीच केली आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी महापालिका हद्दतील रुग्णांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडची अद्ययावत माहिती उपलब्ध करुन देण्याबाबत बैठकीत निर्देश दिले होते. त्यानुसार आयुक्त अजीज शेख यांनी तातडीने कार्यवाही करत आज सकाळी जुन्या महापालिकेच्या इमारतीत ‘कोविड सहाय्यता कक्ष‘ कार्यान्वित केला. या कक्षामध्ये २४ तास रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयातील सर्वसाधारण कक्ष, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडबाबत अद्ययावत माहिती मिळणार आहे. यामुळे बेडअभावी रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे. या कक्षाचा संपर्क क्रमांक ०२५६२-२८८३२० असा आहे. ज्यांना उपलब्ध बेड बाबतची माहिती हवी आहे, त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती देणारे ‘अ‍ॅप‘ देखील महापालिकेमार्फत विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी खाजगी तांत्रिक संस्थेमार्फत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. येत्या काही दिवसातच हे अ‍ॅप तयार होणार असून नागरिकांना घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर या ‘अ‍ॅप‘मार्फत रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती मिळू शकणार आहे.

Web Title: Bed information can be obtained from the Corporation's 'Covid Assistance Room'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.