धुळ्यात बायको निवडणूक लढणार म्हणून नवऱ्याला मारहाण
By देवेंद्र पाठक | Updated: June 23, 2023 17:35 IST2023-06-23T17:35:15+5:302023-06-23T17:35:27+5:30
शिंदखेडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल झाला.

धुळ्यात बायको निवडणूक लढणार म्हणून नवऱ्याला मारहाण
धुळे : तुझी पत्नी निवडणुकीत कशी उभी राहते या कारणावरुन वाद घालत दोन जणांनी एकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. ही घटना शिंदखेडा येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल झाला.
उदयभान अभिमन पाटील (रा. कंदाणे ता. शिंदखेडा) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिंदखेडा येथील श्रीजी हॉटेलमध्ये उदयभान पाटील आपल्या दोन मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेले होते. बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन जण तिथे आले आणि पाटील यांच्याशी वाद घालू लागले. तुझी पत्नी निवडणुकीत कशी काय उभी राहते असे बोलून उदयभान पाटील यांना शिवीगाळ केली. त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता पाटील यांना खाली पाडून हाताबुक्याने मारहाण करण्यात आली. जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.