सरपंचाला विरोध न करणाऱ्या महिलेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:09+5:302021-03-18T04:36:09+5:30
याप्रकरणी पीडित महिलेसह विराेधी गटातील दोघांनी परस्पर फिर्याद दिली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला मंगळवारी दुपारी १२.३० वाजता ...

सरपंचाला विरोध न करणाऱ्या महिलेस मारहाण
याप्रकरणी पीडित महिलेसह विराेधी गटातील दोघांनी परस्पर फिर्याद दिली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला मंगळवारी दुपारी १२.३० वाजता घरात एकटी असताना किरण देसले व ग्रामपंचायत सदस्य मनीष देसले हे दोघे दारू पिऊन तिच्या घरी आले. तुम्ही आमच्या पार्टीच्या ग्रामपंचायत सदस्य आहात, जर आम्ही सरपंचाला विरोध करीत आहोत तर तुम्ही का करीत नाही, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर पीडित महिलेने माझ्यावर दडपण आणू नका असे सुनावले. या बोलण्याचा राग आल्याने, दोघांनी घरात घुसून तोडफोड केली. महिलेचा हात धरून घराबाहेर काढत विनयभंग केला. तर मनीष देसलेने काठीने मारहाण केली. आरडाओरड झाल्याने, गल्लीतील ग्रामस्थ गोळा झाले. पीडितेचा मुलगा व पती हे दोघेही आले असता, त्यांना बघून संशयित पळून केले. मात्र जाताना त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर किरण देसले यांनीही परस्परविरोधी फिर्याद देऊन राजकीय वादातून मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे.