पाडळद्यात एकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 22:46 IST2020-05-31T22:45:45+5:302020-05-31T22:46:02+5:30
ऊसतोडीची मजुरी मागितल्याचा राग

पाडळद्यात एकाला मारहाण
धुळे : ऊस तोडीची मजुरी मागितल्याचा रोग आल्याने तिघांनी मिळून मजुरांच्या मुकादमला मारहाण केल्याची घटना धुळे तालुक्यातील पाडळदे गावात शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमाराला घडली़
देविदास हारसिंग राठोड, दयाराम देविदास राठोड, तुळशिदास देविदास राठोड या तिघांनी रघुनाथ श्रीचंद राठोड (५०) या मुकादमला हाताबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली़ तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ रघुनाथ राठोड याने ऊसतोडीची मजुरी मागितली होती़ मजुरांना त्यांची मजुरी देणे लागत असल्याने त्याने विनंती केली़ परंतु यामुळे वाद विकोपाला गेल्याने तिघांनी त्यांच्यावर हल्ला चढविला़ दरम्यान, याप्रकरणी रघुनाथ राठोडच्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़