वडिलांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST2021-01-15T04:30:11+5:302021-01-15T04:30:11+5:30
दुचाकी अपघात धुळे : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील मुकटी गावाच्या शिवारातील हॉटेल दिलीपजवळ पारोळा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ...

वडिलांना मारहाण
दुचाकी अपघात
धुळे : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील मुकटी गावाच्या शिवारातील हॉटेल दिलीपजवळ पारोळा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. ही घटना ९ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. यात राहुल उत्तम पवार (२८, रा. मुकटी, ता. धुळे) या तरुणाला दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उत्तम पोपट पवार यांच्या फिर्यादीवरून १३ जानेवारीला रोजी गुन्हा दाखल झाला.
दुचाकी लांबविली
धुळे : साक्री तालुक्यातील दहिवेल गावातील रामनगर भागातून एमएच १८ एजी ७७६० क्रमांकाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने लांबविली. ही घटना १२ ते १३ जानेवारी दरम्यान घडली. सर्वत्र शोधाशोध करूनही दुचाकी मिळून आली नाही. या प्रकरणी सागर साहेबराव बहिरम या तरुणाने १३ जानेवारी रोजी रात्री पावणेआठ वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.