कर्करोग होवू नये यासाठी काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 22:53 IST2020-02-05T22:53:23+5:302020-02-05T22:53:45+5:30
जिल्हा रुग्णालय : जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : जागतिक कर्करोग दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयात तंबाखू व अमली पदार्थांची होळी करण्यात आली तर जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली़
जिल्हा रूग्णालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन केले़ तर डॉ. नितीन पाटील यांनी कर्करोगाच्या निदान व उपचार किती महत्वाचा आहे़
तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्करोग आठवडा पाळण्यात येणार असून जिल्हा रुग्णालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांना तंबाखू विषयी जनजागृती पर चित्रफीत दाखवण्यात येणार असल्याचे डॉ़ पाटील यांनी सांगितले़ शासकीय कार्यालयात कर्करोग निदान मोहीम राबविण्यात येणार आहे. जनजागृती वाढविण्यासाठी शिबिरांचे आयोजन तसेच मौखिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व्यसनमुक्तीबाबत आग्रह धरण्यासाठी उपक्रम होईल़
या प्रसंगी डॉ. महेश भडांगे, डॉ़ अभय शिनकर, डॉ रवी सोनवणे, डॉ प्रशांत पाटील, प्रतिभा घोडके, जयश्री चौधरी, डॉ मसने, डॉ गीतांजली सोनवणे, महेंद्र नेरकर आदी उपस्थित होते.