फळे घेण्यापूर्वी सावधान... खरेदीपूर्वी हे तपासून पहा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:41 IST2021-08-14T04:41:24+5:302021-08-14T04:41:24+5:30
धुळे : फळ लवकर पिकावे यासाठी फळांवर केमिकलचा वापर करण्यात येतो. त्यामुळे फळे घेण्यापूर्वी ते नैसर्गिक पद्धतीने पिकवले असल्याची ...

फळे घेण्यापूर्वी सावधान... खरेदीपूर्वी हे तपासून पहा !
धुळे : फळ लवकर पिकावे यासाठी फळांवर केमिकलचा वापर करण्यात येतो. त्यामुळे फळे घेण्यापूर्वी ते नैसर्गिक पद्धतीने पिकवले असल्याची खात्री करा मगच घ्या. तसेच फळांना चांगला रंग यावा यासाठीही केमिकलचा वापर वाढला आहे. त्यामुळे उपवासात फळे खाताना ते चांगले असल्याचे तपासून घेणे फायद्याचे आहे.
पिकवण्यासाठी किंवा चांगला रंग येण्यासाठी वापरले जाते केमिकल -
आतापर्यंत फळ पिकवण्यासाठी केमिकलचा वापर केला जायचा आता मात्र फळे व भाज्यांना चांगला रंग यावा, ते ताजे दिसावे यासाठीही केमिकलचा वापर होतो आहे. पीजीआर नावाचे केमिकल पाण्यात टाकतात व त्या पाण्यात फळे बुडवली जातात. यामुळे फळे चमकतात.
असे ओळखाल नैसर्गिक पिकवलेले फळ -
रासायनिक पद्धतीने पिकवलेली फळांना चकाकी जास्त असते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे डाग नसतात. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी, पेरू व डाळिंब यांसारख्या फळांवर काळे ठिपके पडलेले असतात. कृत्रिमरीत्या फळांवर मात्र कोणत्याही प्रकारचे ठिपके दिसून येत नाहीत.
सहा ठिकाणी केली तपासणी -
मागील सात महिन्यांत शहरातील सहा ठिकाणी फळे व भाजीपाल्याची तपासणी केल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाचे सहाय्यक उपायुक्त संतोष कांबळे यांनी दिली. मात्र एकही ठिकाणी केमिकलचा वापर झालेली फळे व भाजीपाला आढळला नसल्याचे त्यांनी सांगितले.