धुळे येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयातून 2 संगणकांसह बॅटरी लंपास
By Admin | Updated: June 10, 2017 17:47 IST2017-06-10T17:47:22+5:302017-06-10T17:47:22+5:30
संगणकासह 54 हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली

धुळे येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयातून 2 संगणकांसह बॅटरी लंपास
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 10 - शहरातील पारोळा रोडवरील पशुवैद्यकीय चिकित्सालयातून चोरटय़ांनी दोन संगणकासह 54 हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शनिवारी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
शहरातील पारोळा रोडवर पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय असून अज्ञात चोरटय़ांनी गुरूवारी रात्री 10 ते शुक्रवारी सकाळी 6 वाजेदरम्यान चिकित्सालयाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला़ तेथून 24 हजार रूपये किंमतीचे संगणकाचे दोन मॉनिटर, 20 हजार रूपये किंमतीचे दोन सी़पी़यू. व 10 हजार रूपये किंमतीच्या दोन बॅट:या असे एकूण 54 हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेल़े
शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षकाला कडी तोडलेली दिसून आल्याने त्याने पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे डॉ़विठ्ठल देशमुख यांना माहिती दिली़ त्यानुसार त्यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े त्यावरून अज्ञात चोरटय़ांविरूध्द भादंवि कलम 380, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े