कोरोना लसीकरणासाठी ह्यआधारह्ण बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 22:53 IST2021-03-09T22:52:47+5:302021-03-09T22:53:18+5:30
धुळे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने मंगळवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत केले.कोरोना ...

dhule
धुळे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने मंगळवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत केले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ४५ वर्षापुढील आणि ६० वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. लसीकरणासाठी आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, काही नागरिकांकडे आधारकार्ड नाही. यामुळे त्यांना कोविड लसीकरणाचा लाभ मिळणार नाही. म्हणून यंत्रणेने यातून मार्ग काढावा, अशी सूचना सदस्यांनी केली. यावर ज्या नागरिकांकडे आधारकार्ड नसेल त्यांचे रेशनकार्डमध्ये नाव असल्यास लसीकरणाचा लाभ द्यावा, अशी सूचना सभापतींनी केली. मात्र आधारकार्डशिवाय लसीकरण करता येणार नाही, असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
धुळे तालुक्यातील अंगणवाड्यांना बेबीकेअर किटचे वाटप सध्या करण्यात येत आहे. यासाठी वरिष्ठस्तरावरून पंचायत समितीकडे किट प्राप्त णाल्या आहेत. नवीन अंगणवाडीच्या बांधकामासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी हेमंतराव भदाणे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतून शेतकऱ्यांना पाच एचपीचे कृषीपंप व ताडपत्रीचा लाभ देण्यात आल्याचे कृषी अधिकारी चौधरी यांनी सांगितले. तर दुरुस्तीसंदर्भातील आठ कामे निविदास्तरावर असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले. त्वरीत कार्यादेश देण्याचे आदेश आहेत.